अवघड अभ्यास, सोपा करा! कसा?

अभ्यास म्हणजे पाठांतर नाही माहिती लक्षात ठेवणे नाही, चांगले इंग्रजी बोलता, पुस्तकात वाचलेले परीक्षेत जशास तसे उतरवणे नाही.

{{DATE}}

40% ते 96%

माझी 96% मार्क मिळवण्याची आणि MBBS प्रवेशाची गोष्ट!

माझी वैयक्तिक गोष्ट सांगतो.मला एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचे होते. त्यासाठी 95 टक्के पेक्षा जास्त मार्क पाहिजे होते (एंट्रन्स एक्झाम यायच्या पूर्वी). पण मी अभ्यासात साधारण होतो 55 ते 60 टक्के चा विद्यार्थी. माझ्या वेळेला वर्षभर रेगुलर ट्युशन्स नव्हते फक्त उन्हाळ्याचे व्हेकेशन होते . तब्येत खराब असल्याकारणाने व्हेकेशन मिस झाले बारावीचे कॉलेज लेट उशिरा जुलै च्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाले आणि 15 ऑगस्टला कॉमन ऑफ आला. आता परीक्षेला वेळ भरपूर होता पण स्वतः अभ्यास करण्याशिवाय पर्याय नव्हता.
दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरल्या एक माझी तीव्र इच्छाशक्ती(will power) होती आणि दुसरे म्हणजे मी प्रामाणिक होतो.
मी एक पुस्तक उघडून मधूनच कुठल्यातरी पानावर पॅरेग्राफ काढून वाचायला सुरुवात केली. एक दोन ओळी वाचल्या आणि स्वतःला विचारलं किती कळते शांत बसून आठवण्याचा प्रयत्न केला किती समजले तर आतून आवाजाला पाच दहा टक्के. यालाच मी प्रामाणिक म्हणतो. मग मी स्वतःला दुसरा प्रश्न केला अशा पद्धतीने अभ्यास केला तर शंभर टक्के गॅरंटेड खात्रीने 95% च्या पुढे मार्क पडतील का म्हणजे जवळजवळ शंभर टक्के? शांत बसून स्वतःला प्रश्न विचारला अजून आवाज आला नाही शक्य नाही. मग स्वतःला विचारले काय प्रॉब्लेम समस्या आहे? पहिले उत्तर आले काही समजत नाही मग परत मी स्वतःला विचारलं का? आतून आवाज आला की हे वाक्य खूप मोठा आहे त्याच्यामुळे लेखकाला काय म्हणायचे ते शंभर टक्के कळत नाही असे करत मी समस्या शोधत गेलो मग स्वतःला प्रश्न विचारला की या समस्या 100% सोडवल्या तर मार्क मिळतील का ? मग आतून आवाज आला शक्यता आहे. मग परत शांत बसून मी स्वतःला विचारलं मग परत शांत बसून मी स्वतःला विचारले किती टक्के शक्य आहे मग आतून उत्तर आलं 40% शक्यता आहे मग मी स्वतःला विचारले की आता काय समस्या आहे मग आतून समस्या येत गेल्या जसं हे लक्षात राहणार नाही परीक्षेचा पॅटर्न माहिती नाही व्यवस्थित प्रेझेंटेशन झाले पाहिजे योग्य वेळेत प्रेसेंटेशन झाले पाहिजे फिगर चार्ट व्यवस्थित आणि लगेच ड्रॉ करता आला पाहिजे तर होऊ शकते. मग परत स्वतःला विचारलं किती टक्के खात्री आहे की होईलच आतून आवाज आला की आता 70 80 टक्के खात्री वाटते. मग स्वतःला विचारलं की काय समस्या आहे? आतून आवाज आला हे झालं तर शक्यता आहे पण जर बोर वाटायला लागलं रटाळ वाटायला लागलं आणि बसून वाचण्याची इच्छा नाही झाली तर मग नाही होणार. मग म्हटलं की हे बोर वाटण्याची समस्या रटाळपणाची समस्या सोडवली तर मग आतून आवाज आला 85 टक्के पर्यंत शक्यता आहे मग परत प्रश्न विचारला की 100% का नाही मग आतून आवाज आला की काही समस्या वैयक्तिक माझ्या आहेत जसे की दुपारी जेवल्यावर झोप येणे सलग बसला तर पाठ दुखेल आणि सुट्टीच्या दिवशी टीव्ही वरती चित्रपट येतात ते बघण्याचा मोह होईल आणि खेळायला खूप आवडते तिकडे गेलं तर थकून आल्यावर झोपून जाऊ अभ्यास होणार नाही. मग परत मी स्वतःला विचारलं जर या समस्या सोडवल्या तर मग आतून आवाज आला 95% शक्यता आहे होऊन जाईल मग विचारलं पाच टक्के काय समस्या आहे आतून आवाज आला की तब्येत चांगली राहिली पाहिजे आणि परीक्षेच्या वेळेला नेमका आजारी नाही पडला पाहिजे तर अभ्यास होईल.मग मी स्वतःला विचारलं की ही समस्या जर सोडवली तर मग आतून उत्तर आले की जवळजवळ 98 ते 100% शक्यता आहे आणि मग मी प्रत्येक समस्येचा उपाय शोधायला सुरुवात केली आणि जेव्हा पूर्ण उपाय माझ्याकडे आले त्यावेळेला मी कॉन्फिडंट आत्मविश्वासू झालो की आता 95% च्या पेक्षा जास्त मार्क सहज येतील. मग 2% अजून एक शंका होती की पेपर ऑड किंवा वेगळा आला तर? मग मी परीक्षकाची सायकॉलॉजी समजून घेतली ऑर्ड पेपर कसा काढला जातो याचा अभ्यास केला त्याच्यासाठी मला पूर्ण पेपर सेट करणारा तयार करणारा याची सायकॉलॉजी समजून घ्यावी लागली पेपर कसा आणि का तयार केला जातो ते शोधले ऑड चे परसेंटेज शोधलं आणि जवळजवळ 100% यशाची खात्री आली आणि अभ्यास करत गेलो सुरुवातीला गती खूप कमी होती पहिला एक पॅरेग्राफ करण्यासाठी आठ तास लागले. मग मी स्वतःला विचारले यातून काहीही विचारलं तरी 100% मार्क मिळतील का? आणि आतून उत्तर आले हो मग कळालं दिशा योग्य आहे मग मी अभ्यास करत गेलो गती वाढत गेली 16 ऑगस्टला सुरू केलेला अभ्यास 16 सप्टेंबरला पूर्णपणे संपला.

{{AUTHOR}}
डॉ. संदीप खरात (एमबीबीएस), Study Coach/ अभ्यास मार्गदर्शक