युट्युब motivational व्हिडिओ बघून अभ्यासात यश का मिळत नाही?

Wed Oct 22, 2025

अभ्यासाची योग्य पद्धती समजून घ्या

युट्युब मध्ये अभ्यासाचे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत. Motivation ने थोडी यशाची शक्यता वाटते पण अभ्यासात यश मिळत नाही. असे का होते ते बघू. मुळात युट्युब चे व्हिडिओ आपण अभ्यासात अपयशी/ depressed/ fail झाल्यावरच पाहतो. या विडिओ मध्ये दुसरे लोक पण फेल होतात असे पाहतो आणि आपल्या मनाला consolation सहानुभूती मिळते. मग आपण व्हिडिओला कनेक्ट होतो. मग अभ्यासात तयार होणारा प्रॉब्लेम सांगितला जातो त्याला डिफाइन व्याख्या केले जाते ही व्याख्या खूप वरवर आणि तंतोतंत नसते. समस्येची चुकीची व्याख्या केल्यानंतर चार-पाच उपाय सोल्युशन सांगितले जातात. जसे की पोमोडोरो टेक्निक डिस्ट्रक्शन टाळा ध्यान भटकवटकवू देऊ नका लक्ष केंद्रित करा फोकस वेळेचे नियोजन टाईम मॅनेजमेंट करा छोटा टारगेट अचिव केल्यानंतर स्वतःला ट्रीट द्या आणि डोपामीन पुश/ आनंद मिळवा इत्यादी इत्यादी. हे उपाय ऐकून खोटी अपेक्षा False Hope तयार होते. पण समस्येची व्याख्या चुकीची आहे निदान चुकीचे आहे तर उपाय सुद्धा चुकीचे होणार. नेमकं याच गोष्टीमुळे या उपायांचा अभ्यासासाठी फायदा होत नाही अभ्यासात मन लागत नाही एकाग्रता होत नाही आणि कन्सेप्ट संकल्पना समजत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याचे अभ्यासातले समस्या किंवा अडथळे वेगवेगळे असतात आणि असं जनरल सामान्य उपायांनी ही समस्या सुटू शकत नाही. त्यामुळे असे मोटिवेशनल व्हिडिओ ऐकून अभ्यासात कधीही सुधारणा होत नसते. यावर उपाय म्हणजे नेमकी समस्या तुमची ओळखा समस्येचे निदान करा मिळालेला निदानाला क्रॉस चेक करा आणि व्यावहारिक उपाय शोधा. अभ्यास हे मनाचे काम असल्यामुळे इथे मानसिकता म्हणजेच Attitude/ एटीट्यूड अभ्यासाचा समजून घेणे अभ्यासाची योग्य पद्धती समजून घेणे आणि अभ्यासाच्या मार्गातले अडथळे ओळखणे हे सर्व गोष्टी करावे लागतात आणि यासाठी स्वतः अभ्यासाची शिकण्याची पद्धत Self-Study Learning Method ही फायद्याची ठरते.

Dr. sandeep kharat
Dr. Sandeep Kharat (MBBS), Self Learning Study Method Coach