लाखो रुपये कोचिंग मध्ये खर्च न करता काय परीक्षा यश/High Rank मिळवता येऊ शकते का?

होय!!! सहज परीक्षेत यश मिळवता येऊ शकते!

Tue Dec 30, 2025

माझी गोष्ट

होय!!! सहज परीक्षेत यश मिळवता येऊ शकते!
मी बारावीला असतांनी मेडिकल ला जायचं ठरवले. त्यावेळेला कोचिंग क्लास वगैरे नव्हते मग कॉलेज मध्ये व्हेकेशन क्लासेस उन्हाळ्याच्या सुट्टीत असायचे. तब्येत खराब असल्याने ते मला करता आले नाही आणि बारावीचे कॉलेज जुलै च्या मध्ये चालू झाले, पण 15 ऑगस्ट ला मुलांनी Common Off डिक्लेअर केला. मग स्वतः अभ्यास करण्या शिवाय पर्याय नव्हता. अकरावीला मला 40 टक्के मार्क होते त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करणे किंवा 95% च्या वर पीसीबी मध्ये मार्क आणणे अशक्य वाटत होते. पण इच्छाशक्ती तीव्र होती म्हणून 16 ऑगस्ट पासून स्वतःच अभ्यासाला सुरुवात केली पुस्तक वाचायला लागलो एक पॅरेग्राफ असल्यानंतर प्रामाणिकपणे स्वतःला विचारलं किती कळतंय? आणि याच्यावर किती टक्के शक्यता आहे? की यश मिळेल आतून आवाज आला पाच दहा टक्के पण शक्यता वाटत नाही. मग काय समस्या आहे या मी शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला उपाय शोधले आणि माझी अभ्यासाची पद्धती विकसित केली. या पद्धतीने मी काम करत गेलो आणि 16 ऑगस्टला चालू केलेला अभ्यासक्रम 16 सप्टेंबरला 100% संपला. नंतर या पद्धतीने जसा वेळ मिळेल तसा कोणी मदत मागितली तर परीक्षेत यशासाठी मार्गदर्शन केले . कोणी एमबीबीएस ला लागले कोणी सी ए ची परीक्षा पास झाले कोणी लॉ ची परीक्षा पास झाले कोणी एमपीएससी मधून यूपीएससी मधून क्लासवन अधिकारी झाले आणि अशी असंख्य उदाहरणे आहेत.
तर मित्रांनो मी स्वतः विकसित केलेले या पद्धतीला मी स्व- अध्ययन पद्धती किंवा स्वतः अभ्यासाची पद्धती असे नाव देऊन कोर्स लॉन्च केला. या पद्धतीने तुम्ही कोणीही असाल आणि काहीही शिकायचे असेल तरी ते खूप लवकर आवडीने सहज आणि चिरकाल स्मरणात राहील असे शिकू शकता. माझ्या उदाहरणावरून मी सांगू शकतो की जर तुम्हाला यश मिळवण्याची इच्छाशक्ती असेल आणि स्वतःला सुधारण्याची तयारी असेल तर तुम्ही माझ्या या कोर्सचा वापर करून तुमचे इच्छित ध्येय गाठू शकता. तुमची आकलन क्षमता तुमची बुद्धिमत्ता सुधारण्यासाठी सुद्धा या पद्धतीचा खूप उपयोग होईल बाहेरच्या कुठल्याही साधनांची जसे की क्लासेस कोचिंग youtube व्हिडिओ यांची आवश्यकता राहणार नाही आणि खूप कमी वेळेत तुमचे ध्येय तुम्ही साध्य कराल.

Dr. sandeep kharat

Dr. Sandeep Kharat (MBBS), Self Learning Study Method Coach